बातम्या

नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या -शिवसेना उबाठाचे आजरा तहसीलदार यांना निवेदन

Ubhata gat


By nisha patil - 8/10/2025 11:09:11 PM
Share This News:



नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या -शिवसेना उबाठाचे आजरा तहसीलदार यांना निवेदन

आजरा(हसन तकीलदार):-यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50हजार इतकी थेट आर्थिक मदत जाहीर करावी. 

 

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा. अशा प्रमुख मागण्यासोबत इतर मागण्यासाठी शिवसेना उबाठा तर्फे आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

 विधानसभेच्या निवडणूकीच्यावेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. परंतु जवळपास एक वर्ष उलटूनही याबाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ, दिवसेंदिवस खतांचे व औषधाचे वाढणारे दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांचे भाव हमीभावापेक्षा कमी मिळत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा प्राप्त होत नाही. आपला देश खेड्यानी बनला आहे. आणि खेडी शेतीवर अवलंबून आहेत.

येथील लोकांचे शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने व योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत.

दिवसेंदिवस याचे आकडे वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपायोजना आहे. त्यासाठी थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस, दुग्धउत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यामध्ये समविष्ट करून उपरोक्त मागण्यासहीत कर्ज माफी करावी यासाठी शिवसेना उबाठाने आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

 निवेदनावर संभाजी पाटील (उपजिल्हाप्रमुख), युवराज पोवार (तालुका प्रमुख ) यांच्यासह महेश पाटील, दिनेश कांबळे, समीर चांद, संजयभाई सावंत, अमित गुरव, ओमकार माद्याळकर, बिलाल लतीफ, अरुण कांबळे, रोहन गिरी, हरिश्चंद्र व्हराकटे आदींच्या सह्या आहेत.


नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या -शिवसेना उबाठाचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
Total Views: 76