बातम्या
बातमीचा इम्पॅक्ट आणि उबाठा युवासेनेच्या आंदोलनाला यश*
By nisha patil - 6/26/2026 4:53:11 PM
Share This News:
**बातमीचा इम्पॅक्ट आणि उबाठा युवासेनेच्या आंदोलनाला यश*
**आजरा स्टॅंडवर तिसरा डोळा कार्यान्वयीत*
*आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा शहरात दिवसेंदिवस चोरी आणि घरफोडीची गुन्हे वाढतच आहेत. त्याचप्रमाणे आजरा एस. टी. स्टॅंडवर पाकीटमार, महिलांच्या दागिन्यांची चोरी, युवकांचा धुडगूस अशा घटनांच्यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
मागच्या आठवड्यात महिलांचे दागिने लंपास करण्यात आली. स्टॅंडवर सिसिटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलीस प्रशासनालाही तपास कामात अडचण व मर्यादा येत आहेत. त्यासाठी उबाठाच्या युवासेनेमार्फत महेश पाटील यांच्या नेतृत्वात दोन दिवसापूर्वी आजरा आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांना सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. जर चार दिवसात सिसिटीव्ही कॅमेरे बसवले नाही तर बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला होता आणि याबाबतचे सविस्तर वृत्त आमच्या चॅनेलने प्रसिद्ध केले होते. बातमीचा इम्पॅक्ट आणि निवेदनाचे यश यामुळे आता एस. टी. स्टॅंडवर सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम तातडीने सुरु केले आहे. आमच्या चॅनेलने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून आंदोलनाला यश संपादन करून दिल्याबद्दल जय शिवराय किसान संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ कांबळे यांनी आमच्या चॅनेलचे आभार व्यक्त करीत महेश पाटील यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचेही कौतुक केले.सिसिटीव्ही बसवल्याने एस. टी., पोलीस प्रशासन तसेच प्रवाशांचीही चांगली सोय आणि उपयोग होणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बातमीचा इम्पॅक्ट आणि उबाठा युवासेनेच्या आंदोलनाला यश*
|