विशेष बातम्या
शक्तिपीठ महामार्गावरून उद्धवसेनेचा हल्लाबोल..
By nisha patil - 7/21/2025 2:35:17 PM
Share This News:
शक्तिपीठ महामार्गावरून उद्धवसेनेचा हल्लाबोल..
शंभर कोटींचे रस्ते कुठे? – उद्धवसेनेचा महायुतीला सवाल!
कोल्हापुरात रविवारी पार पडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात माजी खासदार विनायक राऊत यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी हा प्रकल्प ठेकेदार आणि दलालांच्या फायद्यासाठी असून, शेतकऱ्यांच्या घरांवर वरवंटा फिरवणारा असल्याचा आरोप केला.
राऊत म्हणाले की, जोपर्यंत हा प्रकल्प पंचगंगा नदीत विसर्जित होत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांत बसू नये. दरम्यान, आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जनतेच्या फसवणुकीचा आरोप केला.
प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत, केंद्र सरकारवर राज्याला दुर्लक्षित करण्याचा आरोप केला. तर शंभर कोटींचे रस्ते गायब झाल्याचा सवाल करत आमदार प्रभूंनी “मग पैसे गेले कुठे?” असा सवाल केला.
या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती, मात्र संजय पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
शक्तिपीठ महामार्गावरून उद्धवसेनेचा हल्लाबोल..
|