बातम्या

इस्लामपूरमध्ये उद्धव शिवसेना शंखध्वनी आंदोलनाची तयारी;

Uddhav Shiv Sena preparing for conch shelling protest in Islampur


By nisha patil - 9/29/2025 3:14:22 PM
Share This News:



इस्लामपूरमध्ये उद्धव शिवसेना शंखध्वनी आंदोलनाची तयारी; 

शकिल सय्यदांच्या नेतृत्वाखाली निवेदन तहसीलदारांना

इस्लामपूर (हसन तकीलदार) – माजी नगरसेवक शकिल सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इस्लामपूर तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले. यात वीज महावितरण कंपनी आणि अदानी गँगकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय प्रीपेड मीटर बसवण्यात आल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

शकिल सय्यद यांनी सांगितले की, जुने मीटर काढून नवीन प्रीपेड मीटर बसवल्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होईल आणि शासनाच्या आदेशांचे उल्लंघन होत आहे. त्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करून बसवलेले मीटर तात्काळ काढून पुर्ववत जुने मीटर बसवण्याची मागणी केली.

शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. शकिल सय्यद यांनी शहरातील विज ग्राहकांना प्रीपेड मीटर लावू नयेत, तसेच लेखी पत्र देऊन जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्याचे आवाहन केले.


इस्लामपूरमध्ये उद्धव शिवसेना शंखध्वनी आंदोलनाची तयारी;
Total Views: 191