विशेष बातम्या
उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय हालचालींना वेग..
By nisha patil - 7/17/2025 7:14:34 PM
Share This News:
उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय हालचालींना वेग..
सत्तेत येण्यासाठी स्कोप.. उद्धव ठाकरेंना थेट ऑफर..
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज मोठी भेट होणार आहे. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात होणार असून, दोघेही याठिकाणी पोहोचले आहेत.
याआधी फडणवीस यांनी “सत्तेत येण्यासाठी स्कोप आहे” असं सांगत उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली होती.
या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उद्धव आणि राज ठाकरे यांचा अलीकडील एकत्र मेळावा व संभाव्य युतीच्या चर्चेमुळेही या घडामोडींकडे अधिक लक्ष वेधलं जात आहे.
उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय हालचालींना वेग..
|