शैक्षणिक
व्यंकटराव येथे उमंग महोत्सव उत्साहात संपन्न.. तीन दिवस महाराष्ट्राच्या लोकधारेची रंगत..
By nisha patil - 2/1/2026 1:30:00 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरामध्ये शैक्षणिक वर्ष 2025 -26 अंतर्गत "उमंग "महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यादरम्यान महाराष्ट्राची लोकधारा हा अनोखा कार्यक्रम राबविण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.
29 डिसेंबर रोजी शेलापागोटे व फनी गेम्स यांचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थी,पालक, शिक्षक आदिनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 30 डिसेंबर रोजी "ध्यानाचे महत्त्व" या विषयावर डॉ. गोपाळ ऐरोनी यांनी मार्गदर्शन केले तर जयवंत आवटे यांनी "जगणं सुंदर करूया" या विषयावर आपल्या विनोदी शैलीतील व्याख्यानाने विद्यार्थी आणि श्रोत्यांना हास्य रसात अक्षरशः भिजवून काढले.
31 डिसेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत महाराष्ट्राच्या लोक कलेचे देखणे सादरीकरण इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य ,नाट्य ,गायन या विविध प्रकारात आपली कला गुणांचे सादरीकरण केले. यासाठी प्रत्येक वर्गासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
तीन दिवसाच्या या भरगच्च उमंग महोत्सवात संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी,उपाध्यक्ष कृष्णा पटेकर, सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक सचिन शिंपी ,पांडुरंग जाधव ,सुधीर जाधव, विलास पाटील, सौ. अलका शिंपी ,सौ. प्रियांका शिंपी , प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष शेळके, प्र.प्राचार्य पन्हाळकर सर, प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही. देसाई,संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजरा नगरपंचायतचे नूतन नगरसेवक, माजी शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यंकटराव येथे उमंग महोत्सव उत्साहात संपन्न.. तीन दिवस महाराष्ट्राच्या लोकधारेची रंगत..
|