बातम्या

मामा-भाचीचा वाढदिवस एकाच दिवशी; उत्साहात साजरी झाली माहीची पाचवी वर्षपूर्ती

Uncle and nieces birthdays on the same day


By nisha patil - 4/17/2025 4:49:19 PM
Share This News:



मामा-भाचीचा वाढदिवस एकाच दिवशी; उत्साहात साजरी झाली माहीची पाचवी वर्षपूर्ती
गडदे फार्महाऊसवर जल्लोषमय वाढदिवस सोहळा

टाकळीवाडी (प्रतिनिधी) – कुमारी माही हिचा पाचवा वाढदिवस गडदे फार्म हाऊस गार्डन, शिवशक्तीनगर (डायमंड हॉटेल जवळ, कुपवाड) येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे पत्रकार नामदेव निर्मळे यांचाही वाढदिवस त्याच दिवशी असल्याने मामा-भाचीचा संयुक्त वाढदिवस सोहळा जल्लोषात पार पडला.

या खास दिवशी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून माहीला शुभेच्छा दिल्या आणि आकर्षक भेटवस्तूंनी तिचा आनंद द्विगुणित केला. पोलीस विभागातर्फेही माहीला भेटवस्तू देण्यात आली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.

कार्यक्रमाचे स्वागत सौ. कविता निर्मळे यांनी अतिशय आत्मीयतेने केले. उपस्थित पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमुळे वाढदिवसाला खास आकर्षण लाभले.


मामा-भाचीचा वाढदिवस एकाच दिवशी; उत्साहात साजरी झाली माहीची पाचवी वर्षपूर्ती
Total Views: 183