बातम्या
मिरज रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना – अनोळखी पुरुषाचा करंट लागून मृत्यू
By nisha patil - 8/21/2025 5:44:34 PM
Share This News:
मिरज रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना – अनोळखी पुरुषाचा करंट लागून मृत्यू
मिरज : मिरज रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अंदाजे २.०० वाजण्याच्या सुमारास मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उभी असलेल्या (KWWE/BTPN) या रेल्वेगाडीच्या डब्यावर चढत असताना ओव्हरहेड वायरमधून शॉक बसल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
मृतदेह मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आला असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण इलेक्ट्रिक शॉक (Electrocution) असे नमूद केले आहे.
👉 मृत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे :
वय : अंदाजे ४० वर्षे
बांधा : मजबूत
उंची : ५ फूट ५ इंच
चेहरा : गोल, रक्ताळलेला
रंग : सावळा
नाक : सरळ
केस : काळे, वाढलेले
दाढी-मिशी : काळी, वाढलेली बारीक
कपडे : अंगात आकाशी रंगाचा फुलबाह्यांचा पूर्ण फाटलेला शर्ट (रक्ताचे डाग लागलेले), राखाडी रांगाची फाटलेली पॅन्ट
मिरज रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना – अनोळखी पुरुषाचा करंट लागून मृत्यू
|