शैक्षणिक
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान
By nisha patil - 6/15/2025 1:39:07 AM
Share This News:
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान
कोल्हापूर : कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वीकारला.
माध्यम क्षेत्रातील ‘नवभारत’ समूहातर्फे आयोजित ८व्या हेल्थ केअर समिटमध्ये हा सन्मान देण्यात आला. लाखो गरजू रुग्णांपर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सेवा पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हॉस्पिटलच्या कार्याची दखल घेण्यात आली.
२००३ पासून कार्यरत असलेल्या हॉस्पिटलमार्फत मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीमा, तसेच कोरोना काळात समर्पित सेवा देण्यात आली. यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमचे तसेच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान
|