विशेष बातम्या

एकता आणि देशभक्तीचा जागर – कोल्हापुरात भाजपकडून सरदार पटेल जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा’ उत्साहात संपन्न

Unity and Patriotism Vigil


By nisha patil - 10/31/2025 4:45:09 PM
Share This News:



एकता आणि देशभक्तीचा जागर – कोल्हापुरात भाजपकडून सरदार पटेल जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा’ उत्साहात संपन्न

भारताच्या एकतेचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भव्य ‘एकता पदयात्रा’ आज मोठ्या उत्साहात पार पडली.

सकाळी दसरा चौकातून प्रारंभ झालेल्या या पदयात्रेला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देशभक्तीच्या जयघोषात यात्रा सुरू झाली.छत्रपती शिवाजी पेठेतील हिंद प्रतिष्ठानच्या आखाड्याने दांडपट्टा आणि काठीचे मर्दानी खेळ सादर केले.

तिरंगा हातात घेऊन कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले.पदयात्रा दसरा चौक–बिंदू चौक–छ.शिवाजी रोडमार्गे छ.शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली.

या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.धनंजय महाडिक म्हणाले, “सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताला एकसंध राष्ट्र म्हणून ओळख मिळाली.”

आमदार अमल महाडिक म्हणाले, “भाजप फक्त विकासच नाही तर देशाच्या संस्कृती आणि मूल्यांच्या जतनासाठीही कटिबद्ध आहे.”या कार्यक्रमात अमर साठे, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, विजय सूर्यवंशी, माधुरी नकाते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकजुटीने देशाच्या अखंडतेचा आणि एकतेचा संकल्प पुन्हा दृढ केला.


एकता आणि देशभक्तीचा जागर – कोल्हापुरात भाजपकडून सरदार पटेल जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा’ उत्साहात संपन्न
Total Views: 37