बातम्या

हिंदू धर्मीयांची एकजूट हेच श्रावण व्रतवैकल्याचे फलित – आमदार क्षीरसागर

Unity of Hindus is the result of observing Shravan fast


By nisha patil - 12/8/2025 2:44:22 PM
Share This News:



हिंदू धर्मीयांची एकजूट हेच श्रावण व्रतवैकल्याचे फलित – आमदार क्षीरसागर

कोल्हापूर – समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशनच्या वतीने श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी (दि. 11) नष्टे लॉन येथे “श्रावण व्रतवैकल्य” सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पंचगंगा नदीच्या पाण्याने महादेव आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा जलाभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

१०८ जोडप्यांनी मंत्रघोषात केळीच्या पानांवर सात्विक भोजन घेत उपवास सोडला. महायज्ञ, गोमाता पूजन, आरती, घोषणाबाजी आणि इस्कॉन भजनी मंडळाच्या भजनांनी वातावरण भारावले. पाच हजारांहून अधिक हिंदू समाजबांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

आमदार क्षीरसागर यांनी १२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमातून हिंदू धर्मीयांची एकजूट अधिक बळकट होत असून, लव्ह जिहाद कायदा, गोहत्या बंदी कायदा, भोंगे नियंत्रण यांसारख्या मागण्या पूर्ण झाल्याचे सांगितले. राज्यभरात हा उपक्रम विस्तारावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.


हिंदू धर्मीयांची एकजूट हेच श्रावण व्रतवैकल्याचे फलित – आमदार क्षीरसागर
Total Views: 63