शैक्षणिक

विद्यापीठाला ‘खेलो इंडिया’त शूटिंगमध्ये कांस्यपदक

University wins bronze medal in shooting at Khelo India


By nisha patil - 11/27/2025 5:41:58 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स- २०२५ मध्ये शिवाजी विद्यापीठाला आज शूटिंगमध्ये कांस्यपदक प्राप्त झाले. 
विद्यापीठाचे खेळाडू रणवीर अजितसिंह काटकर (डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, कोल्हापूर), अथर्व गंगाराम पाटील (डी. वाय. पाटील इंजीनियरिंग कॉलेज, कोल्हापूर), प्रतीक आनंदा जोंग (नाईट कॉलेज, कोल्हापूर) यांनी १० मीटर एअर रायफल टीम या प्रकारात १८६८.८ इतक्या गुणांसह कांस्य पदक पटकावले.


या खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यापीठ पथकप्रमुख डॉ. एन.डी. पाटील यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक डॉ. धनंजय पाटील, सचिन जाधव, शिवाजी दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.


विद्यापीठाला ‘खेलो इंडिया’त शूटिंगमध्ये कांस्यपदक
Total Views: 13