राजकीय
पन्हाळ्यात बिनविरोधची लाट! रामानंद गोसावीही बिनविरोध
By nisha patil - 11/20/2025 6:08:18 PM
Share This News:
पन्हाळ्यात बिनविरोधची लाट! रामानंद गोसावीही बिनविरोध
अपक्ष गायब, राजकारणात खळबळ
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत बिनविरोध निवडीचं राजकारण आणखी गती घेतंय. सतीश भोसले यांच्या पाठोपाठ जनसुराज्य पक्षाचे रामानंद गोसावीही निर्विरोध. त्यांच्या विरोधातील दोन्ही कार्यकर्त्यांनी माघार घेतली.
दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी रुपाली धडेल आणि ऐश्वर्या तोरसे यांच्या माघारीनंतर स्पर्धा आता तीन अर्जांवर.
उद्या माघारीचा शेवटचा दिवस — आमदार विनय कोरे पन्हाळगडावर येऊन अपक्षांना बोलवणार, बिनविरोध करण्याचा मोठा प्रयत्न.
आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट — अपक्ष उमेदवार दोन दिवसांपासून ‘फोन बंद’ करून गायब!
जिल्ह्यात चर्चा रंगल्या… “पन्हाळ्यात सर्वच जागा बिनविरोध जाणार का?”
पन्हाळ्यात बिनविरोधची लाट! रामानंद गोसावीही बिनविरोध
|