विशेष बातम्या
कोल्हापुरात अवकाळी पावसाचा कहर – तात्काळ पंचनाम्यांची मागणी
By nisha patil - 5/28/2025 6:18:38 PM
Share This News:
कोल्हापुरात अवकाळी पावसाचा कहर – तात्काळ पंचनाम्यांची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यात मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती, घरे, जनावरे, रस्ते व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे वाया गेले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत तात्काळ मदत देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशीही जोरदार मागणी करण्यात येत आहे.
राज्य शासनाने या अवकाळी पावसाला ‘राज्य विशेष नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित केल्यामुळे SDRF च्या निधीतून त्वरित मदत शक्य आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
कोल्हापुरात अवकाळी पावसाचा कहर – तात्काळ पंचनाम्यांची मागणी
|