बातम्या
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर! मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट
By nisha patil - 4/14/2025 3:36:50 PM
Share This News:
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर! मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट
राज्यात अवकाळी पावसाचे संकट अद्यापही कायम असून, अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात सध्या पावसाला पोषक हवामान तयार झाले असून, सततच्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत.
मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने याठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होत असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर! मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट
|