विशेष बातम्या

कोल्हापुरात हटके वरात! नवरदेवाची जेसीबीवरून एंट्री; ‘पैलवान आला’ गाण्यावर थिरकले नातेवाईक!

Unusual wedding in Kolhapur

By nisha patil - 8/11/2025 3:51:53 PM
Share This News:

कोल्हापुरात हटके वरात! नवरदेवाची जेसीबीवरून एंट्री; ‘पैलवान आला’ गाण्यावर थिरकले नातेवाईक!

अलिशान कार वा घोड्यावरून वरात काढण्याची परंपरा मोडीत काढत कोल्हापुरात एका नवरदेवाने चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात काढून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शिंगणापूर रोडवर काढण्यात आलेल्या या हटके वरातीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

वरपिता राजेश दत्तात्रय माने हे स्वतः जेसीबी व्यवसायात असून, मुलगा संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नासाठी त्यांनी आपल्या चार मशिन्सपैकी एक जेसीबी वरातीसाठी खास सजवली.

उच्चशिक्षित या नवदांपत्याच्या वरातीमध्ये मित्र-नातेवाईकांनी “पैलवान आला… पैलवान आला…” अशा गाण्यांवर धमाल डान्स करत रंगत वाढवली. स्थानिक नागरिकांनीही या ‘जेसीबी वराती’चा आनंद लुटत कोल्हापुरच्या हटके परंपरेला पुन्हा एकदा सलाम ठोकला!

कोल्हापुरात हटके वरात! नवरदेवाची जेसीबीवरून एंट्री; ‘पैलवान आला’ गाण्यावर थिरकले नातेवाईक!
Total Views: 46