बातम्या

38 वर्षाची परंपरा जपत कला प्रेमी गणेशोत्सव मंडळ, महागाव एकतेचा संदेश देत,नवसाला पावणार गणपती

Upholding a 38 year old tradition and spreading a message of unity


By nisha patil - 9/17/2026 9:55:15 PM
Share This News:



38 वर्षाची परंपरा जपत कला प्रेमी गणेशोत्सव मंडळ, महागाव एकतेचा संदेश देत,नवसाला पावणार गणपती

आजरा(हसन तकीलदार)-: कला प्रेमी गणेशोत्सव मंडळ, महागाव हे केवळ एक मंडळ नसून महागावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. सन 1987 पासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आज 38 व्या वर्षात दिमाखात साजरी होत आहे.या मंडळाची पायाभरणी कै. दशरथ कोकितकर, कै. बाबूराव कोकितकर, कै. शिवाजी कोकितकर, कै. सुरेश कोकितकर वसंत रेडेकर आणि कै. संजय कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली आणि दूरदृष्टीने झाली. त्यांनी लावलेल्या एकतेच्या आणि कलाप्रेमाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
 

त्यांचाच वारसा पुढे चालवत सध्याची कार्यकारिणी जोमाने काम करत आहे.दरवर्षी सामाजिक संदेश देणारी नाविन्यपूर्ण सजावट हे मंडळाचे वैशिष्ट्य राहिले आहे.रागोळी प्रदर्शन ठेवले जाते.
 

 हिंदू-मुस्लिम एकतेचे जिवंत प्रतीक म्हणजे हे मंडळ आहे.या मंडळात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकाच मंडपात, एकाच विचाराने काम करतात. हेच या मंडळाचे खरे यश आहे.समतेचा संदेश देत सर्वधर्मीय एकत्र येत एकोप्याने उत्सव साजरा केला जातो.
 

यंदा मंडळाने सर्व भाविकांसाठी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला आहे. एकाच ठिकाणी गणपती दर्शन,भावेश्वरी देवी दर्शन,विठ्ठल मंदिर दर्शन,दत्त मंदिर दर्शन,मोहरम दर्गा दर्शन एकाच ठिकाणी घेता येणार आहे. गावातील सर्व मंदिरे आणि दर्ग्याचे एकत्रित दर्शन ही संकल्पना महागावची एकता दर्शवते.
तरी सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी या आगळ्या-वेगळ्या देखाव्याचा लाभ घ्यावा आणि बाप्पाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन अध्यक्ष आकाश कोकितकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

यावेळी उपाध्यक्ष : अनिकेत थोरवत,खजिनदार : अमित कोकितकर,सचिव : नाना कोकितकर
सदस्य : समीर कोकितकर, संदेश कोकितकर, अशपाक मुरसल,अर्जुन रेडेकर दिलीप कोकितकर, अनिल कोकितकर,दीपक कूटाळे चिन्मय पाठक, सागर नाडगोंडा, अनिल रेडेकर, अनिल चौगुले, सादिक देसाई आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


38 वर्षाची परंपरा जपत कला प्रेमी गणेशोत्सव मंडळ, महागाव एकतेचा संदेश देत,नवसाला पावणार गणपती
Total Views: 12