शैक्षणिक
उर्दू हायस्कूलचे शासकीय चित्रकला स्पर्धा व बालवैज्ञानिक संमेलनात घवघवीत यश
By nisha patil - 1/23/2026 11:40:53 AM
Share This News:
उर्दू हायस्कूलचे शासकीय चित्रकला स्पर्धा व बालवैज्ञानिक संमेलनात घवघवीत यश
आजरा (हसन तकीलदार ):- उर्दू हायस्कूलचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल 100% लागला असून दोन्ही परीक्षेत "ए" श्रेणीत व "बी" श्रेणीत सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे उत्तुर येथे संपन्न झालेल्या 22व्या बाल वैज्ञानिक संमेलनामध्ये डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आजराची इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी कु. निदा आक्रम वाडीकर हिला पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाले तिला संस्थेचे शाळेचे प्र.मुख्याध्यापक सलीम म. हनिफ शेख यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच विज्ञान शिक्षिका सौ. स बिहा अझहरुद्दिन भडगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत 100%निकाल लागला असून
इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकूण 7 विद्यार्थ्यानी भाग घेतला होता त्यापैकी
ए श्रेणीत 1 विद्यार्थी,
बी श्रेणीत 2 विद्यार्थी तर
सी श्रेणीत एकूण 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एलिमेंट्री परीक्षेमध्ये
एकूण 7 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी सातही विद्यार्थी
सी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत आणि शाळेचा 100% निकाल लागला आहे.
सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना कला शिक्षक तसेच अध्यक्ष हाजी आलम नाईकवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
उर्दू हायस्कूलचे शासकीय चित्रकला स्पर्धा व बालवैज्ञानिक संमेलनात घवघवीत यश
|