ग्रामीण

आजरा एस.टी. स्टँडवर संरक्षक भिंत बांधण्याची तातडीची गर

Urgent need to build protective wall at Ajra ST stand


By nisha patil - 9/20/2025 11:06:11 AM
Share This News:



आजरा:- ( हसन तकीलदार) आजरा एस.टी. स्टँडवर एक खाजगी चारचाकी वाहन उतारावरून आपोआप महामार्गावर गेले आणि काही टू-व्हीलर गाड्यांना किरकोळ नुकसान झाले. या अपघातात कुणालाही जीवितहानी झाली नाही, परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित झाला आहे.

एस.टी. महामंडळाने प्रवाश्यांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून भव्य व सर्व सोयीसुविधांनी युक्त बसस्थानक उभारले आहे, परंतु खाजगी वाहनांचे अतिक्रमण सुरू असून रिक्षा थांबे हटवल्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. वृद्ध, अपंग आणि रुग्ण प्रवाश्यांना तातडीने रिक्षा उपलब्ध होणे आवश्यक असतानाही रिक्षा थांबे महामार्गाच्या कडे करावे लागत आहेत, ज्यामुळे रस्त्यावर अडचणी निर्माण होत आहेत.

खाजगी वाहनांचे अतिक्रमण, स्टँडवर थांबविलेली वाहने, आणि चालकांमध्ये वादाचे प्रकार लक्षात घेता, आगार प्रमुखांनी स्टँड समोरील बाजूला संरक्षक भिंत बांधून रिक्षा थांब्याचे नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 


आजरा एस.टी. स्टँडवर संरक्षक भिंत बांधण्याची तातडीची गर
Total Views: 69