विशेष बातम्या
विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाहीच.
By nisha patil - 7/6/2025 4:03:19 PM
Share This News:
विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाहीच.
विशाळगडावर १५ जून पर्यंत बंदी आदेश लागु
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्ना खातर पुरातत्व विभागाकडून विशाळगडावरील मलिक रेहान दर्गा उरूसाला परवानगी नाकारली आहे.अशी माहिती आज शाहूवाडी तहसीलदारांकडून मिळाली आहे.
किल्ले विशाळगड हा राज्यसंरक्षित स्मारक असून सध्याची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता राज्य पुरातत्व विभागाच्या संचालकानी किल्ल्यावरिल उरूसास दि 06 जून 2025 चे आदेशाने परवानगी नाकारली आहे.तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, शाहुवाडी यांचा भारतीय नागरिक संहिता 2023 चे कलम 163 नुसार विशाळगड किल्ल्याचे परिसरामध्ये 1 जून ते 15 जून 2025 या कालावधीत हा बंदी आदेश लागू करण्यात आलाय. या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये नागरिकांना विशाळगड किल्ल्यावर जाता येईल . बाहेरील नागरिकांना किल्ल्यावर पाच नंतर थांबता येणार नाही. दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे बंधन कारक असल्याचा आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शाहुवाडी यांनी दिले आहेत.
विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाहीच.
|