बातम्या

ए.आय.तंत्रज्ञानाचा वापर करा आणि एकरी ऊसउत्पादन वाढवा - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Use AI technology and increase sugarcane production per acre


By nisha patil - 10/25/2025 3:09:16 PM
Share This News:



ए.आय.तंत्रज्ञानाचा वापर करा आणि एकरी ऊसउत्पादन वाढवा - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

टोलनाका तालुक्याबाहेर नेणार-नामदार प्रकाश आबिटकर

आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा 27व्या गळीत हंगाम शुभारंभाचे मोळी पूजन नाम. हसन मुश्रीफ यांचे हस्ते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाम. प्रकाश आबिटकर यांनी भूषवीत वरूण राजाच्या साक्षीने कार्यक्रम पार पडला. पावसाची रिपरिप असल्याने कार्यक्रम मंडपात घेता आला नाही ऐनवेळी हा कार्यक्रम कारखान्याच्या बिल्डिंगमध्ये घ्यावा लागला.
      

सर्वप्रथम काटा पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संचालक अनिल फडके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता फडके यांच्या हस्ते पार पडला. स्वागत कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी करताना कारखाना चालवताना येणाऱ्या अनंत अडचणीचा आढावा घेतला. तसेच संकेश्वर बांदा महामार्गावरील टोलनाका रद्द करण्याबाबत, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत आणि कारखान्यासाठी सहप्रकल्प उभारण्यासाठी मदतीचे आवाहन दोन्ही नामदारांना केले.
    
याच प्रश्नांचा धागा पकडत नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, कारखानदारी वाचवायची असेल तर ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे एकरी उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. कारखानदारीत स्पर्धा वाढली आहे. 100दिवसांवर गळीत हंगाम येऊन ठेपला आहे यावर्षीही 100दिवसांचाच गाळप हंगाम होणार आहे. त्यामुळे भविष्यात गाळप दिवस वाढवायचे असतील तर एकरी उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून किमान 100एकरावर ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला. प्रेसमड, स्पेन्टवॉश पासून सी. एन.जी प्रकल्प, सोलर प्रकल्प असे सह प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न करू. टोल बाबत सांगताना म्हणाले की किमान 15किलोमीटर पर्यंत टोल बाहेर नेण्यासाठी प्रयत्न करू. वन्यप्राण्याबाबतही उपाय काढू. 4लाख मे.टन गाळप करून तोटा कमी करण्यासाठी गाळप आणि उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
    
अध्यक्षीय भाषणात नाम. प्रकाश आबिटकर म्हणाले की, कारखान्याच्या अडचणी सर्वांनी मांडल्या. स्पर्धा आहे. शेतकऱ्यांपर्यंत पोहचून संपूर्ण ऊस गाळपासाठी आणणे गरजेचे आहे. आजरा तालुका सहकाराचे वैभव आहे. निवडणूकीच्यावेळी राजकारण असावं परंतु विकासाच्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हत्तीसंगोपन केंद्र सुरु करू. यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्या. घाटकरवाडीच्या पुढे टोलनाका नेण्यासाठी प्रयत्न करणार यासाठी केंद्रीय परीवहन मंत्री गडकरी यांचेशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहुया.
   
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई म्हणाले की, कारखाना बंद पडल्यानंतर तसेच प्रत्येक अडचणीच्यावेळी मुश्रीफ साहेबांनीच मदत केली आहे. प्रत्येक वेळी ते मदतीला धावून येतात. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गण कमी झालेत पुढे जाऊन स्वीकृत सदस्य घेणार असे समजते तेव्हा शासनाचा जी. आर. निघाला तर आजऱ्याचा प्रधान्याने विचार व्हावा असेही त्यांनी सांगितले.
    
यावेळी व्हा. चेअरमन सुभाष देसाई, ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदयदादा पवार, मारुती घोरपडे, एम. के देसाई, रणजीत देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजू जोशीलकर, हरिभाऊ कांबळे, दीपक देसाई, राजू मुरुकटे, संभाजी पाटील, गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, रशीद पठाण, नामदेव नार्वेकर, दिगंबर देसाई, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, अबूताहेर तकीलदार,राजेंद्र सावंत, विठ्ठलराव देसाई, दौलत पाटील, अनिकेत कवळेकर, जितेंद्र भोसले, विजय थोरवत, इंद्रजित देसाई, रियाज तकीलदार,आलम नाईकवाडे,कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्यशेतीधिकारी विक्रमसिंह देसाई,अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद, वाहतूकदार, कंत्राटदार आदिजण उपस्थित होते. सूत्रसंचलन रमेश देसाई यांनी केले तर आभार संचालक काशिनाथ तेली यांनी मानले


ए.आय.तंत्रज्ञानाचा वापर करा आणि एकरी ऊसउत्पादन वाढवा - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Total Views: 111