विशेष बातम्या

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.

Utkarsh Awalekar and Yogesh Chimte were awarded


By nisha patil - 6/23/2025 12:12:50 PM
Share This News:



डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.

तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या "संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी" विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या विषयात विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी जाहीर झाली आहे.

उत्कर्ष अरुण आवळेकर यांनी  "क्लाऊड कंप्युटिंग आणि वायरलेस सेन्सर नेटवर्कचा वापर करून आयओटी आणि एआय आधारित स्मार्ट शेती प्रणाली" या विषयावर डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला.
योगेश विरुपाक्ष चिमटे यांनी "आंबा व भुईमूग पिकांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी एकत्रित मशीन लर्निग तंत्रज्ञानाचा वापर" या विषयावर प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला.

डॉ. उत्कर्ष आवळेकर व डॉ. योगेश चिमटे यांना कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रो. (डॉ.) के. प्रथापन, कुलसचिव प्रो. (डॉ.) जे. ए. खोत, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली मनोहर भूपती,  मुख्य वित्त अधिकारी सुजित सरनाईक, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील यांचे सहकार्य व पाठबळ लाभले.


डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.
Total Views: 94