बातम्या

नांगरतास येथे व्ही. एस. आय. उत्पादीत कृषी निविष्टा विक्री केंद्राचे थाटात उदघाटन

V S I Agricultural Input Sales Center inaugurated at Nangartas


By nisha patil - 4/25/2026 11:02:05 AM
Share This News:



नांगरतास येथे व्ही. एस. आय. उत्पादीत कृषी निविष्टा विक्री केंद्राचे थाटात उदघाटन

आजरा( हसन तकीलदार):-आंबोली येथील नांगरतास येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे ऊस प्रजनन संशोधन केंद्र कार्यरत असून या ठिकाणी ऊसाच्या नवनवीन जाती विकसित करण्याचे काम सुरु आहे. येथे जवळपास 1700 ते 1800 ऊसाच्या जातीवर संशोधन सुरु असून जास्तीत जास्त उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या ऊस जाती निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. आणि आता याच ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने उत्पादीत केलेल्या कृषी निविष्टा विक्री केंद्राचे उदघाट्न संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.


व्ही. एस. आय. पुणे ही ऊस संशोधन संस्था ऊस पिकासाठी प्रामुख्याने वसंतऊर्जा हे नावीन्यपूर्ण जैवसंजीवक उत्पादीत करते. जे भाभा अणूसंशोधन केंद्राच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे जैवसंजीवक पिकाची वाढ, जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. नत्र उपलब्ध करून देणारे हरीतके, व्ही. एस. आय. ह्यूमिक, सॉईल हेल्थ, बुरशी व किटक नाशके,मल्टीमायक्रो व मल्टीमॅक्रोन्यू्ट्रीयन्ट अशी जैवीक व रासायनिक निविष्ठा याठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे व्ही. एस. आय. निर्मित सर्व निविष्ठाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचे आवाहन कडुपाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. तसेच या केंद्रामधून जे शेतकरी किंवा कृषी सेवा केंद्र दुकानदार निविष्ठा खरेदी करतील त्यांना विक्री दरावर 10% सूट देण्याचे ठरले आहे. या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले 

 

याप्रसंगी संस्थेचे चीफ अकाउंटंट शिवाजी खेंगरे, प्रमुख शास्त्रज्ञ व हेड ऊस प्रजनन विभाग डॉ. कपिल सुशीर, शास्त्रज्ञ व आंबोली फार्म इन्चार्ज एन. व्ही. शिपूरकर तसेच भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नांगरतास येथे व्ही. एस. आय. उत्पादीत कृषी निविष्टा विक्री केंद्राचे थाटात उदघाटन
Total Views: 110