शैक्षणिक
साहित्यिक वि. स. खांडेकर यांना आंतरभारतीचे अभिवादन..
By nisha patil - 2/9/2025 12:34:10 PM
Share This News:
साहित्यिक वि. स. खांडेकर यांना आंतरभारतीचे अभिवादन..
कोल्हापूर : मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक पद्मभूषण भाऊसाहेब तथा वि.स. खांडेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (2 सप्टेंबर) रोजी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
टाकाळा येथील वि.स.खांडेकर यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ शिक्षक व मार्गदर्शक भरत लाटकरसर व वसंत पाठकसर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक विजय भोगम, मुख्याध्यापक एम. बी. जमादार, मुख्याध्यापक संजय सौंदलगे, मुख्याध्यापक सुरेश संकपाळ, शिक्षक पी.आर.गवळी, गुलाब आत्तार, गजानन गुरव, संजय कळके, सागर पाटील उपस्थित होते.
राजारामपुरी येथील वि. स. खांडेकर यांच्या नंदादीप येथील घरी कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर, सचिव एम. एस. पाटोळे, संध्या वाणी,सहसचिव भरत अलगौडर, संचालक हसन देसाई, भरत लाटकर,नेहा कानकेकर यांनी भेट देवून साहित्यिक खांडेकरांच्या कुटूंबियांपैकी जावई डॉ. अतुल कापडीया,डॉ. सी. आर. कापडी या यांची भेट घेऊन साहित्यविषयक आठवणींना उजाळा दिला . डॉ. कापडीया यांनी साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या लेखनविषयक जाणिवांची आठवण सांगितली . सचिव एम.एस. पाटोळे यांनी साहित्यिक आढावा घेतला आणि सकस लेखनाने खांडेकरांनी प्रत्येकाच्या मनावर गारुड केल्याचे मत व्यक्त केले . टाका ळा येथील साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या अर्धपुतळ्या जवळ सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .यावेळी ज्येष्ठ सेवाव्रती भरत लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले .कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, खांडेकर प्रशालेचे दगडू रायकर, वृषाली कुलकर्णी, राजाराम संकपाळ, रणधीर मिरजकर, वसंत पाठक, विजय भोगम यांचेसह खांडेकर प्रशाला, सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
साहित्यिक वि. स. खांडेकर यांना आंतरभारतीचे अभिवादन..
|