शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांची जयंती साजरी
By nisha patil - 12/1/2026 5:20:34 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: मराठी साहित्यास पहिले भारतीय ज्ञानपीठ परितोषिक मिळवून देणारे साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त काल (दि. ११) विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्या हस्ते वि.स. खांडेकर यांच्या अर्धपुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप,डॉ. उदयसिंह राजेयादव तसेच स्मृती संग्रहालयाचे सहकारी नितीन गंगधर, ऐश्वर्या भुरटे आणि शीतल कांबळे आदी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांची जयंती साजरी
|