बातम्या
आजरा साखरच्या प्रायोगिक ऊस प्लान्टेशनला व्ही. एस. आय. च्या महासंचालकांची भेट
By nisha patil - 11/13/2025 5:41:57 PM
Share This News:
आजरा साखरच्या प्रायोगिक ऊस प्लान्टेशनला व्ही. एस. आय. च्या महासंचालकांची भेट
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर विविध ऊसजातीच्या ऊसाची लागण करण्यात आली आहे. या ऊसाच्या तुऱ्यांचे निरीक्षण व परीक्षण करून त्या तुऱ्यांच्यामधून बिजाण्ड घेऊन त्यांचे संकर करणार आहे. लागण केलेल्या या उसांची पाहणी करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे महासंचालक संभाजी कडू पाटील व इतर सहकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी प्रयोग यशस्वी होत असलेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आजरा तालुक्यातील पश्चिम भाग म्हणजे प्रति चेरापुंजी म्हटले जाते. त्यामुळे या भागात ऊसाचे उत्पादन कमी येते. यासाठी या भागात अति पावसातही कोणती ऊस जात योग्य प्रमाणात उत्पादन देऊ शकते याचा अभ्यास केला जातो. यासाठी नांगरतास येथे व्ही. एस. आय. चे संशोधन केंद्र कार्यरत आहे. त्यानुसार कारखाना कार्यस्थळावर ऊसाच्या विविध 13 जातींची लागण करण्यात आली आहे. याठिकाणी कोणत्या ऊस जातीला तुरे येतात याचे निरीक्षण व परीक्षण करून या तुऱ्यामधून बिजाण्ड घेऊन संकर करणार असलेबाबत सांगण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झालेने कारखाना कार्यस्थळावर साधारण 0•20 आर क्षेत्रात विविध ऊस जातींची लागवड करून प्रायोगिक ऊस प्लॉट तयार करणार आहेत. उपस्थित मान्यवारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यकारी संचालक संभाजी सावंत म्हणाले की,व्ही. एस. आय. चे मार्गदर्शन आमच्या कारखान्याला वेळोवेळी मिळत असते. कारखाना कार्यस्थळावर बेणेप्लॉट तयार करण्यासाठी आमच्या कारखान्याचे सहकार्य राहील असे सांगितले.
यावेळी व्ही. एस. आय. चे वरिष्ठ शास्त्रज्ञ कपिल सुशीर, व्ही. एस आय. चे अकाऊंटन्ट शिवाजी किंगरे, कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, उदयदादा पोवार, मारुती घोरपडे, अनिल फडके, दीपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हत्तीवडे), काशिनाथ तेली, शिवाजी नांदवडेकर, हरिभाऊ कांबळे,दिगंबर देसाई, मुख्यशेतीधिकारी विक्रमसिंह देसाई तसेच इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
आजरा साखरच्या प्रायोगिक ऊस प्लान्टेशनला व्ही. एस. आय. च्या महासंचालकांची भेट
|