बातम्या
दुबईत ‘VVIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड’ वितरण सोहळा
By nisha patil - 9/30/2025 12:20:47 PM
Share This News:
दुबईत ‘VVIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड’ वितरण सोहळा
महाराष्ट्रातील आठ मान्यवरांचा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान
गार्गीज डीआयडी फाउंडेशन आणि बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशनच्या तर्फे हॉटेल सिटीमॅक्स, बर, दुबई येथे ‘VVIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आले. भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या कार्यक्रमात सन्मान झाला.
महाराष्ट्रातून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व वनक्षेत्रातील योगदानाबद्दल दशरथ तूपसुंदर, राजेंद्र नाईक, अमित कटके, बाबुराव कांबळे, सौरभ नाईक, मीहीर नाईक, अश्विनी कटके आणि रोहिणी नाईक यांना आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या सोहळ्याचे आयोजन डॉ. मॅडी तामगावकर यांनी केले होते. कार्यक्रमाला सिऑन कंपनीचे संदीप सोदडे, विजय सोदडे व राजेंद्र नाईक यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन दशरथ तूपसुंदर यांनी केले.
दुबईत ‘VVIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड’ वितरण सोहळा
|