राजकीय

वडगाव नगरपालिका निवडणूक निकाल

Vadgaon Municipality Election Results


By nisha patil - 12/21/2025 11:27:11 AM
Share This News:



वडगाव :- वडगाव नगरपालिका निवडणुकीत विद्याताई पोळ यांनी भरीव यश संपादन केले असून त्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा १३५० मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच विद्याताई पोळ यांनी आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत ती कायम राखली.

या यशानंतर वडगाव शहरात त्यांच्या समर्थकांकडून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल विद्याताई पोळ यांनी मतदारांचे आभार मानले असून वडगावच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

वडगाव नगरपालिका निवडणुकीतील हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात स्थानिक विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


वडगाव नगरपालिका निवडणूक निकाल
Total Views: 68