बातम्या

वाघाची तालीम पूर्ण जल्लोषात... अगदी शिवमय वातावरणात मिरवणूक

Vaghachi talim


By nisha patil - 4/19/2026 11:57:27 PM
Share This News:



*वाघाची तालीम पूर्ण जल्लोषात... अगदी शिवमय वातावरणात मिरवणूक*

**आजरा(हसन तकीलदार )*:-रयतेच्या राजाची सालाबाद प्रमाणे यावर्षीही अगदी जल्लोषपूर्ण आणि शिवमय वातावरणात वाघाची तालीम आजरा तर्फे तरुणाईच्या उत्साहात आणि थाटात शिवजयंतीची मिरवणूक पार पडली.

 शिवाजीराव पाटील यांच्या भगिनी भारतीताई जाधव (चंदगड विधानसभा संयोजिका )यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभूतपूर्व सोहळ्याचे उदघाट्न झाले. सोबत आजऱ्याचे युवा नेते जयवंत सुतार (भाजप जिल्हा उपाध्यक्ष )व विनोद फाटक (भाजप युवा मोर्चा चंदगड तालुका अध्यक्ष )आणि प्रभाकर कोरवी यांची उपस्थिती होती.

छत्रपतींच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभूतपूर्व आणि जल्लोषी मिरवणुकीची सुरवात करण्यात आली. वाघाची तालीम मंडळातर्फे भारतीताईंचे स्वागत करण्यात आले. युफोरिया सेरीज फाइव्ह स्टार ऑडिओ आणि लायटिंग हे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. संगीताच्या तालावर, शिवरायांच्या जयघोषात आणि रंगीबेरंगी प्रकाश झोतात युवा मंडळी अगदी उत्साहात मिरवणुकीत तल्लीन झाली होती.

व्यंकटराव हायस्कुल पासून सायंकाळी 7:00वा. मिरवणुकीला सुरवात झाली. आणि ती शिवतीर्थ, सोमवार पेठ, सुतारगल्ली, सिडफार्म, वाणी गल्ली मार्गे शिवतीर्थापर्यंत येणार होती.

   यावेळी वाघाची तालीम मंडळाचे शैलेश पाटील, संतोष उर्फ पिंटू गिरी, मंदार बिरजे, हृतिक बिरजे, स्वप्नील रांगणेकर, आकाश पाटील, राहुल नाईक, विजय थोरवत, शरीफ खेडेकर, संतोष भाटले, शिरीष देसाई, नितीन कांबळे यांच्यासह वाघाची तालीम मंडळाचे कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वात अगदी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


वाघाची तालीम पूर्ण जल्लोषात... अगदी शिवमय वातावरणात मिरवणूक
Total Views: 56