बातम्या
वैष्णवी हगवणे प्रकरण: आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा, हगवणे बंधूंवर नवीन गुन्ह्यांची शक्यता
By nisha patil - 5/30/2025 3:45:45 PM
Share This News:
वैष्णवी हगवणे प्रकरण: आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा, हगवणे बंधूंवर नवीन गुन्ह्यांची शक्यता
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा होत असल्याचं दिसत आहे. तिचा पती शशांक, सासू लता व नणंद करिश्मा हगवणे यांना 28 मे रोजी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. 29 मे रोजी कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर लता व करिश्मा हगवणे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिला आत्महत्येचा कल असल्याचा युक्तिवाद मांडला. या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
याशिवाय, शशांक आणि सुशील हगवणे यांनी पिस्तुल परवाना मिळवण्यासाठी बनावट पत्त्याचा वापर केल्याचं उघडकीस आलं असून, त्यांच्या विरोधात पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. प्रकरणातील गुंतागुंत वाढत असून, पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण: आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा, हगवणे बंधूंवर नवीन गुन्ह्यांची शक्यता
|