बातम्या

४x १०० रिले स्पर्धेत वालावलकर हायस्कूलची चमक ;   विभागीय स्पर्धेसाठी निवड                            

Valavalkar High School shines in 4x100m relay event


By nisha patil - 10/23/2026 11:47:00 AM
Share This News:



४x १०० रिले स्पर्धेत वालावलकर हायस्कूलची चमक ;   विभागीय स्पर्धेसाठी निवड                            

कोल्हापूर   :   नंतर पार्टी शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांताराम पंत वालावलकर हायस्कूलने मनपा शालेय जिल्हास्तरीय ४x १०० रिले या क्रीडा प्रकारात १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अत्यंत चुरशीच्या सामन्यात धवल यश संपादन करीत द्वितीय क्रमांक पटकावला . शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावरती या स्पर्धा पार पडल्या .

सांघिक स्पर्धेत पंत वालावलकर हायस्कूलने बेसबॉल, सॉफ्टबॉल या स्पर्धेतही आपली लक्षवेधक कामगिरी करून १४ आणि १७ या मुला - मुलींच्या चार ही गटात अव्वल स्थान पटकावून हे संघ विभागीय स्पर्धेसाठी मोठ्या दिमाखात दाखल झाले आहेत .

या संघाना शाळेचे क्रीडाशिक्षक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, क्रीडाशिक्षक समीर जमादार, सागर वाडकर यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक सरीता शिंदे, पर्यवेक्षिका सरीता शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले . शालेय समितीचे चेअरमन संजीवभाई परीख, आंतरभारती संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि माजी सचिव एम.एस. पाटोळे यांनी विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे तसेच मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले .


४x १०० रिले स्पर्धेत वालावलकर हायस्कूलची चमक ;   विभागीय स्पर्धेसाठी निवड                            
Total Views: 4