शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात ‘इंडोलॉजी’ विषयावर मूल्यवर्धित अभ्यासक्रम १९ जानेवारीपासून
By nisha patil - 1/17/2026 4:22:12 PM
Share This News:
कोल्हापूर:- शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अभ्यास केंद्राच्या वतीने ‘‘भारतीय विद्येचा परिचय’’ (An Introduction to Indology) या विषयावरील पाच दिवसीय बहुविद्याशाखीय मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १९ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात तो असेल.
भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र आणि प्राचीन वारसा यांचा सखोल अभ्यास करणाऱ्या ‘इंडोलॉजी’(भारतीय विद्या) या विषयाची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम-उषा’ (PM-USHA) योजनेअंतर्गत या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सत्रांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये श्रीमती. सोनाली शहा, डॉ. योगेश प्रभुदेसाई, डॉ. तन्मय भोळे, कु. योगिनी आत्रेय, डॉ. हर्षदा विरकुड, श्री. मानसिंग चव्हाण यांसारखे नामवंत अभ्यासक विविध विषयांवर प्रकाश टाकणार आहेत. इतिहास, संस्कृती आणि भारतीय परंपरेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप, इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील, डॉ. दत्तात्रय मचाले आणि डॉ. उमाकांत हत्तीकट यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठात ‘इंडोलॉजी’ विषयावर मूल्यवर्धित अभ्यासक्रम १९ जानेवारीपासून
|