बातम्या
वंचित उतरणार आजऱ्याच्या रिंगणात. नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही घोषित
By nisha patil - 11/16/2025 1:53:43 PM
Share This News:
**वंचित उतरणार आजऱ्याच्या रिंगणात. नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही घोषित*
आजरा(हसन तकीलदार)आजरा नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असून वंचित बहुजन पक्षाच्या उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.यावेळी बैठकीत विरोधकांचे कडून ही निवडणूक आर्थिक जोरावर लढवली जात असून सर्वसामान्य लोकांना ही निवडणूक लढवत असताना आवाक्यापेक्षा बाहेर गेली आहे या निवडणुकीमध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा असा आदेश पक्षाचे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला असून पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी आजरा येथे येऊन नगरपंचायतीच्या उमेदवारांची चाचणी केली असता येथुन सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करा अशा सूचना दिल्या आहेत. केवळ कामाच्या आणि जाहीरनाम्याच्या जोरावर ही निवडणूक लढवली जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
आजरा येथील बैठकीमध्ये सर्वांना एकत्र घेऊन नाराज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या निवडणुकी मधून देऊन वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व दाखवणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर दक्षिणचे उपाध्यक्ष गौतम कांबळे यांनी व्यक्त केले.
यासाठी आजऱ्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते न्यामत मुजावर यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.या बैठकीला जिल्हा महासचिव दीपक कांबळे, जिल्हा खजिनदार आर.बी.कांबळे, सचिव सर्जेराव कांबळे, संघटक अहमद युसुफ नसरदी, निवडणूक समन्वयक दत्तात्रय कांबळे, प्रवीण कश्यप, सादिक माणगावकर किरण संमेक आर्यन कांबळे,संदीप कांबळे व आघाडीतील प्रमुख उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित होते.यामुळे याचा परिणाम कोणत्या आघाडीवर जास्त होणार हे येणारा काळच ठरवेल.
वंचित उतरणार आजऱ्याच्या रिंगणात. नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही घोषित
|