विशेष बातम्या
प्रज्ञा कांबळे प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचा ‘न्याय निर्धार’ मोर्चा
By nisha patil - 10/28/2025 3:04:50 PM
Share This News:
प्रज्ञा कांबळे प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचा ‘न्याय निर्धार’ मोर्चा
कुरुकली (ता. करवीर) : भोगावती महाविद्यालयाजवळ २४ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळेचा मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून नियोजित खून असल्याचा संशय व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर “न्याय – एक निर्धार” मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी व राज्याचे पोलिस महासंचालक यांना निवेदन देऊन आरोपींवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन, तपास स्वतंत्र समितीकडे सोपविणे, तसेच पोस्टमार्टम आणि सीसीटीव्ही फुटेजचा फेरतपास करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.
आघाडीने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करत आरोपींना संरक्षण दिल्याचा दावा केला. निष्पक्ष तपास न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
> “प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील,” असा निर्धार वंचित बहुजन आघाडीकडून व्यक्त करण्यात आला.
प्रज्ञा कांबळे प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचा ‘न्याय निर्धार’ मोर्चा
|