बातम्या

व्यंकटराव येथे मैदानावर विद्यार्थ्यांना बसवून साकारले भव्य "वंदे मातरम्"

Vande Mataram


By nisha patil - 8/11/2025 11:18:43 AM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):- वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने  व्यंकटराव शिक्षण संकुलात अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ प्राचार्य  एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही.देसाई यांची प्रेरणा तसेच कलाशिक्षक कृष्णा दावणे व एन.सी.सी. ऑफिसर  महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षकांच्या मदतीने प्रशालेच्या मैदानात इयत्ता पहिली ते सातवी या वर्गातील 500 विद्यार्थ्यांनी मिळून ओळीने बसून "वंदे मातरम" व "शाळेचा नवीन सिम्बॉल" साकारले. 

वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने  विद्यार्थ्यांनी वंदेमातरमचा सिम्बॉल अप्रतिम सिम्बॉल साकारला तसेच प्रशालेतील बाल गानकोकिळा कु.शलाका गिरी हिने पी. व्ही पाटील,सौ.ए.एस.गुरव यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या मंजुळ आवाजात "वंदे मातरम" गीत सादर केले
     या उपक्रमांचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यातून कौतुक होत आहे.


व्यंकटराव येथे मैदानावर विद्यार्थ्यांना बसवून साकारले भव्य "वंदे मातरम्"
Total Views: 36