बातम्या

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रम

Various activities at Shivaji University


By nisha patil - 3/10/2025 3:19:24 PM
Share This News:



महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रम 

कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.

सकाळी ठीक आठ वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र अधिविभागाच्या डॉ. नेहा वाडेकर यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथदिली. त्यानंतर प्राचार्य डॉ. विश्वास पाटील लिखित कस्तुरबा गांधी यांचे जीवनचरित्रया पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकातील विषयवैशिष्ट्यांचा आढावा घेऊन त्यांनी गांधी अभ्यास केंद्राच्या कामकाजाचे कौतुक केले.

यानंतर विद्यापीठ परिसरासह केएसबीपी पार्क तसेच नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग परिसरात स्वच्छता ही सेवाअभियानांतर्गत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश नागरिकांना दिला.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. रवींद्र भणगे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, तसेच विद्यापीठासह महाविद्यालयांतील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी या सर्व उपक्रमांस सक्रिय सहभागी झाले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.


महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रम
Total Views: 57