बातम्या
शहाजी महाविद्यालयात संविधान सप्ताह निमित्त विविध उपक्रम संपन्न
By nisha patil - 11/26/2025 4:03:34 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात संविधान सप्ताह निमित्त विविध उपक्रम संपन्न
कोल्हापूर: शहाजी महाविद्यालयात संविधान सप्ताह निमित्त विविध उपक्रम संपन्न झाले. 20 ते 22 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्य भारतीय संविधानातील तत्त्वज्ञान आणि मूल्य भारतीय संविधान आणि लोकशाही, भारतीय संविधान एकतेचा आधारस्तंभ या विषयावरती डॉ. आर .डी. मांडणीकर,डॉ.विजय देठे, प्रा. आर. आर. पाटील यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.23 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधानावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली.या निबंध स्पर्धेत एकूण 80 विद्यार्थ्यांनी निबंध लिहिले.
24 नोव्हेंबर 2025 रोजी संविधानावर आधारित सामान्य ज्ञान क्षमता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेत महाविद्यालयातील 325 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 25 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधानावर आधारित भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन संविधानाची प्रतिज्ञा व विद्यार्थ्यांचे मनोगत आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. भारतीय संविधानावरती प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राज्यशास्त्र, एनएसएस व विवेक वाहिनी विभागाच्या वतीने महाविद्यालयात संविधान सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन ,मार्गदर्शन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात संविधान सप्ताह निमित्त विविध उपक्रम संपन्न
|