बातम्या
आरदाळ ता. आजरा येथे नवरात्रीची विविध रूपातील पूजा बांधणी
By nisha patil - 9/27/2025 3:08:48 PM
Share This News:
आरदाळ ता. आजरा येथे नवरात्रीची विविध रूपातील पूजा बांधणी
आजरा (हसन तकीलदार):- दसऱ्याच्या आधीचे नऊ दिवस म्हणजेच नवरात्र हे देवीदुर्गा आणि शक्तीची पूजा करण्याचे दिवस असतात. या काळात भक्त दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात. यानुसार आरदाळ ता. आजरा येथेही वेगवेगळ्या रूपात देवीदुर्गाची पूजा बांधली आहे. आरदाळ येथील भैरीदेव मंदिरात दोन भावांची भेट अशा रूपात शिवाजी गुरव यांनी पूजा बांधली आहे.
आरदाळ ता. आजरा येथे भैरीदेव मंदिरामध्ये दोन भावांची भेट अशा रूपातील पूजा बांधली आहे. दसऱ्याच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधली जाते शस्त्रधारी रूपातील पूजा, घोड्यावर स्वार रूपातील पूजा, रथावर स्वार, दोन भावांची भेट रूपातील पूजा, शस्त्रधारी उग्र अवतारी रूपातील पूजा, त्रिशूलधारी रूपातील पूजा, देवांचा भरलेला दरबार रूपातील पूजा अशा वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधण्यात येते त्यातील आजची पूजा बांधली आहे ती म्हणजे आरदाळ आणि पेंढारवाडी जवळ जवळ असणारी दोन गावे पेंढारवाडीचा लहान भाऊ दसऱ्याच्या आधी आरदाळच्या मोठ्या भावाला भेटून जातो व दसऱ्याच्या शिमोलंघनास पेंढारवाडीला आरदाळचा भैरीदेव भेटीला जातो, पेंढारवाडी जवळील महादेव पाटील (गुरुजी) यांच्या शेतामध्ये दोन गावच्या पालख्या येतात व भेट होते.
यावेळी दोन्ही गावचे ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पेंढारवाडीचा भैरीदेव भेटीस आला अशा रूपातील आजची पूजा पुजारी शिवाजी गुरव यांनी बांधली आहे.याचे दर्शन भक्त मोठ्या भक्तीभावाने घेत आहेत.
आरदाळ ता. आजरा येथे नवरात्रीची विविध रूपातील पूजा बांधणी
|