बातम्या

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाचणी येथे विविध कार्यक्रम

Various programs at Bachani on the occasion


By nisha patil - 11/17/2026 3:29:46 PM
Share This News:



हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाचणी येथे विविध कार्यक्रम

कागल प्रतिनिधी : अजित बोडके बाचणी (ता. कागल) येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा संघटक संभाजी भोकरे, कागल तालुकाप्रमुख अशोक पाटील, तालुका समन्वयक माळू करीकट्टे, उपतालुकाप्रमुख नागेश कसबे, दिग्विजय पाटील, विभागप्रमुख बाळू माने यांच्यासह संदीप कांबळे, हरी पाटील, के. बी. सोडलकर, शुभम पाटील, राजू शानीदिवाण, चंद्रकांत पाटील, प्रभाकर हातरोटे, बापू पाटील, रमेश कांबळे, अमर कांबळे, सुधाकर चव्हाण, किरण दळवी आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.


हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाचणी येथे विविध कार्यक्रम
Total Views: 12