बातम्या

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त कळंब्यात विविध कार्यक्रम

Various programs in Kalamba on the occasion of Swami Samarth's appearance day


By nisha patil - 7/3/2026 12:30:35 PM
Share This News:



स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त कळंब्यात विविध कार्यक्रम

कळंबा येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवार १४ ते शुक्रवार २० मार्च या कालावधीत कळंब्यात भक्तिमय वातावरण विविध कार्यक्रमात उत्साहात पार पडणार आहेत या उत्सवानिमित्त भजन, पारायण, होम-हवन तसेच महाप्रसाद सोहळा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार १४ रोजी सकाळी श्री महालक्ष्मी मंत्र स्तोत्र पठण तसेच सप्तशती पठणाने कार्यक्रमांची सुरुवात होईल. सायंकाळी ध्वजारोहण करण्यात येणार असून रात्री श्री ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, आमशी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, शनिवार (दि. १४) पासून दररोज सकाळी ८ वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण सुरू होणार आहे. रविवार १५ रोजी श्री पंत महाराज भजनी मंडळ, प्रयाग चिखली यांचे भजन होईल.

सोमवार १६ रोजी 'नादब्रह्म प्रस्तुत गजर भक्तीचा या कार्यक्रमांतर्गत सिद्धराज पाटील यांची भक्तिगीते सादर होणार आहेत. मंगळवार १७ रोजी श्री गुरुमाऊली भजनी मंडळ सिद्धलिंग छप्रे तर बुधवार १८ रोजी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक भजनी मंडळ, वडणगे यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार १९ रोजी सकाळी दत्तयाग होम-हवन सोहळा होणार असून सायंकाळी 'गुढीपाडवा स्वरकल्लोळ' या कार्यक्रमातून भजन व लोककलेचा जागर सादर केला जाणार आहे. शुक्रवार २० रोजी सकाळी लघुरुद्र अभिषेक व श्री सत्यनारायण पूजा होणार आहे. दुपारी महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दिवसभर श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, कळंबा यांचे भजन होणार असून रात्री अभंगनाद प्रस्तुत स्वामी समर्थ भजनी मंडळ, पुंगाव यांचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आवाहन संयोजक श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, कळंबा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके


स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त कळंब्यात विविध कार्यक्रम
Total Views: 7