बातम्या

आजऱ्यात रामनवमी उत्सहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Various programs organized


By Administrator - 3/25/2026 6:12:18 PM
Share This News:



आजऱ्यात रामनवमी उत्सहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
   

आजरा(हसन तकीलदार):-आजरा रामदेव गल्ली येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंदिराच्या सभोवताली मोठा मंडप घालण्यात आला आहे. रामनवमी मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आजरा परिसरातील राममंदिरामध्ये भावीकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ज्यामुळे परिसरात अगदी भक्तीमय आणि चैतन्यमय वातावरण दिसत आहे.
       

रामदेव गल्ली येथेही सालाबादप्रमाणे 'रामनवमी जन्मोत्सव' श्रीराम मंदिरात संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहेत. बुधवार दि. 25/03/2026 रोजी सायंकाळी 04:00 वाजता श्रीराम रक्षास्तोत्र पाठणाचे आयोजन असून गुरुवार दि. 26/03/2026 रोजी सकाळी 08:00 ते 11:00 पर्यंत पंचसूक्त पवमान व पंचायतम सूक्त अभिषेक, दुपारी 12:00 वाजता जन्मकाळ, आरती, दुपारी 12:30 ते 03:00 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील दहा वर्षापासून जवळ जवळ दहा हजार लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भक्तगण व लोकवर्गणीतून हा कार्यक्रम केला जातो. हे श्रीरामाचे मंदिर फार जुने असून मिळालेल्या माहितीनुसार जवळ जवळ शंभर ते सव्वाशेहे वर्षांपूर्वीचे मंदिर असून दहा बारा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आले. पूर्वी जुने मंदिर असताना रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. मंदिरासमोर सोंगी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होत असत. त्या काळात ग्रामीण भागातून मोठ्या आस्थेने आणि भक्तीभावाने भक्त सोंगी भजन पाहण्यासाठी येत होते.

परंतु आता मागील काही वर्षापासून आता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असलेबाबत नेताजी बुरुड यांनी माहिती दिली. गुरुवारी दुपारी 04:30ते 07:00 वा. नादयोगी चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत 'रामगान'प्रभू श्रीरामांची भजने व गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाना ज्या भक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांनी रोख स्वरूपात उमेश कुरुणकर, दीपक करुणकर, रुपेश वाळके, चेतन बुरुड, केळकर ट्रेडर्स, प्रसाद केसरकर पान शॉप यांचेकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


आजऱ्यात रामनवमी उत्सहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Total Views: 107