बातम्या
*तुकाईदेवी नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केले विविध कार्यक्रम
By nisha patil - 10/21/2026 6:45:58 PM
Share This News:
*तुकाईदेवी नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केले विविध कार्यक्रम
*फॅन्सी ड्रेस स्पर्धेने केली सांगता
*आजरा(हसन तकीलदार):-सर्वोदय कॉलनी व विद्यानगर,आजरा येथील तुकाईदेवी नवरात्र उत्सव मंडळातर्फे पंधरा वर्षाखालील मुला मुलींचे फॅन्सी ड्रेस स्पर्धाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जवळ जवळ 27 स्पर्धकांनी भाग घेतला होता. विविध फॅन्सी ड्रेस घालून लहान चिमुकल्यांनी आपली कला सादर केली.
तुकाईदेवी नवरात्रोत्सव सर्वोदय व विद्या नगर यांनी नऊ दिवसांचे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. फनिगेम्स पासून हळदी कुंकू, होममिनिस्टर, पाककला, दांडिया, देवीची महाआरती,भजन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे व नगरसेविका अश्विनी चव्हाण या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर अनिल कांबळे यांनी परीक्षकाची जबाबदारी पार पाडत नेपथ्य तसेच इतर बाबतीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाट्न आजरा कॉलेजचे उपप्राचार्य राजीव टोपले यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी साहिल पाटील, युगंधर पाटील, अवधूत हरमळकर, अभिजित नाईक, तिरूमला ऍग्रोचे निकम, सार्थक कुंभार, अनिल नाईक, उत्तम पाटील, अरुण नाईक, अभिजित जानकर, अनुप कुरुणकर, किरण कोलते, राजू कदम, शरद कोलते,अभिजित नाईक आदिजण उपस्थित होते. अमर जाधव यांनी आभार मानले.
*तुकाईदेवी नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केले विविध कार्यक्रम
|