बातम्या
मलिग्रे येथील भावेश्वरी मंदिर वास्तूशांती निमित्त ७मे ते १०मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
By nisha patil - 4/30/2026 4:41:53 PM
Share This News:
मलिग्रे येथील भावेश्वरी मंदिर वास्तूशांती निमित्त ७मे ते १०मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
आजरा(हसन तकीलदार) - मालिग्रे-कागीणवाडी आणि भक्तांच्या आर्थिक, श्रमिक, वैचारिक सहकार्यातून साकारलेल्या सुंदर अशा भावेश्वरी देवी मंदिराचा वास्तुशांती,कलशरोहण आणि धार्मिकविधी कार्यक्रम 7 मे ते 10 मे रोजी पर्यंत संपन्न होणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मलिग्रे येथील भावेश्वरी मंदिराचे बांधकाम पुर्ण झाले असून गुरूवार 7 मे रोजी पासून मंदीर वास्तुशांती व कलशारोहन सोहळा,धार्मिक विधी आणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
7 मे रोजी मुहूर्तमेढ स्थापना व धार्मिक विधी होत असून 8 मे रोजी सर्व मुर्ती व कलश मिरवणूक सकाळी 8:00वाजता सुरुवात होत आहे. 9 मे रोजी प्रधान देवता व मुर्तीची स्थापना व धार्मिक विधी तर रविवारी 10 मे रोजी महाआरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे . सलग चार दिवस धार्मिक कार्यक्रमासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या दिवसात गावात पाळक असून कलश मिरवणूकीकरीता महिलानी सहभागी होण्याकरीता ग्रुपप्रमाणे सहावारी, नऊवारी एकाच रंगातील साड्यांचे तर पुरुष मंडळीनी सलवार कुर्त्याचे नियोजन केल्याने तसेच माहेरवाशीनी व मुंबई ग्रामस्थ सहभागी होत असल्याने गावाला यात्रेचे स्वरूप येणार आहे. गावात आनंदमय आणि भक्तीमय वातावरण होणार आहे.भावेश्वरी मंदिर जिर्णोध्दार समितीने भावीक,भक्ताना व देणगीदारांना या सोहळ्यात उपस्थित रहाणेचे आवाहन केले आहे.
मलिग्रे येथील भावेश्वरी मंदिर वास्तूशांती निमित्त ७मे ते १०मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
|