बातम्या
विशाल साजणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
By nisha patil - 5/9/2025 3:05:33 PM
Share This News:
विशाल साजणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. सुजित मिणचेकर यांची उपस्थिती, साडी व शैक्षणिक साहित्य वाटप
साजणी (ता. हातकणंगले) : राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, साजणीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विशाल साजणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी उपस्थित राहून डॉ. साजणीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी तसेच संघर्ष संघटनेच्या भगिनींना भेट स्वरूपात साड्या देण्यात आल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, झाकीरहुसेन भालदार, बाळासाहेब वाशीकर, दिनकर कांबळे, मनोज कांबळे, सौ. महानंदा कांबळे, आप्पासो पाटील, रवींद्र कांबळे, दिलीप कांबळे, प्रा. डॉ. सचिन कांबळे, अविनाश कांबळे, पप्पू कांबळे, सयाजी पाटील, संतोष कांबळे, सर्जेराव चौगुले, हरी कांबळे, सुरज कदम, तुफेर कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विशाल साजणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
|