बातम्या
आजरा साखरवर स्व. वसंतराव देसाई यांची पुण्यतिथी
By nisha patil - 12/26/2025 10:55:01 PM
Share This News:
आजरा साखरवर स्व. वसंतराव देसाई यांची पुण्यतिथी
आजरा(हसन तकीलदार)**:-वसंतराव देसाई आजरा शेत.सह.साखर कारखाना लि.अमृतनगर-गवसे येथस्व.वसंतराव देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्य कारखाना कार्यस्थळावर अभिवादन करण्यात आले.
आजरा साखर कारखान्याचे संस्थापक व माजी आमदार स्व.वसंतराव देसाई यांच्या 20 व्या पुण्यतिथी दिनी आज कार्यस्थळावरील त्यांचे पुर्णाकृती पुतळयाचे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुभाष देसाई यांचे हस्ते पुजन करून कारखाना परिवारातर्फे अभिवादन करणेत आले. सन 1980 व 1990 च्या दशकात स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी आपल्या निस्वार्थी सहका-यांसमवेत अथक प्रयत्न करून आजरा साखर कारखाना पुर्णत्वास आणला, आजरा तालुक्यातील गोरगरीब शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण, तोडणी- वहातुक कंत्राटदार मजुर यांच्यासाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठी आजरा साखर कारखाना वरदान ठरला आहे. स्व.वसंतराव देसाई यांचे या कारखान्याच्या उभारणीतील योगदान तालुक्यातील जनतेच्या कायम स्मरणात रहावे यासाठी कारखाना व्यवस्थापनाने कारखाना कार्यस्थळावर त्यांचा पुर्णकृती पुतळा उभारला असून, कारखान्यास वसंतराव देसाई कारखाना असे नांव दिलेले आहे.आज त्याच्या 20 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्य सकाळ पासून कारखान्याचे संचालक एम.के.देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई,राजेश जोशिलकर, काशिनाथ तेली, शिवाजी नांदवडेकर,राजेंद्र मुरूकटे गोविंद पाटील, हरीभाऊ कांबळे व कार्यकारी संचालक एस. के. सावंत, कारखान्याचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आजरा साखरवर स्व. वसंतराव देसाई यांची पुण्यतिथी
|