खेळ
शहाजी महाविद्यालयाच्या वेदांत पवळे ला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक.
By nisha patil - 9/29/2025 5:54:30 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयाच्या वेदांत पवळे ला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक.
कोल्हापूर दिनांक 25 ते 28 सप्टेंबर 2025 रोजी अलिबाग येथे झालेल्या शासकीय शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कनिष्ठ विभाग मधील वेदांत विशाल पवळे (इयत्ता ११ वी कला)याने नाशिकच्या ईशान ठाकूर ला फायनल मॅच मध्ये हरवून वेदांत ने सुवर्ण पदक पटकावले.
त्याची अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व पदक विजेते खेळाडूंना शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शाणेदिवाण सर, प्रबंधक आर जे भोसले सर, अधीक्षक एम व्ही भोसले सर, कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक पी के पाटील सर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.प्रशांत पाटील सर , क्रीडा शिक्षक प्रशांत मोटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शहाजी महाविद्यालयाच्या वेदांत पवळे ला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक.
|