शैक्षणिक

तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कुल सर्वप्रथम

Venkatrao High School came first in the taluka level storytelling competition


By Administrator - 2/28/2026 12:10:01 PM
Share This News:



तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कुल सर्वप्रथम


 आजरा(हसन तकीलदार) :- जिल्हा मराठी भाषा समिती, माध्य. शिक्षण विभाग कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ यांचे वतीने आयोजित तालुकास्तरीय  कथाकथन स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कूलच्या कु.अन्मया रणजीत देसाई हिने प्रथम क्रमांक मिळवला.
अभिवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.सानवी लक्ष्मण चौगुले व कथाकथन मध्ये द्वितीय क्रमांक कु.स्वराली सागर सावंत हिने मिळवला..
    स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक संघ हॉल शिवाजी पार्क कोल्हापूर येथे गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी डॉ. रघुनाथ कडाकणे मराठी व इंग्रजी विभाग प्रमुख राजाराम महाविद्यालय कोल्हापूर यांचे हस्ते करण्यात आला यावेळी  व्यासपीठावर जिल्हाधिकारी  अमोल येडगे  , शिक्षणाधिकारी  श्रीमती सुवर्णा सावंत, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष राहुल पवार उपस्थित होते .

      या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा चे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी ,  उपाध्यक्ष, सचिव ,सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य   एम.एम. नागुर्डेकर , पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार  यांचे प्रोत्साहन लाभले. व श्रीमती एस. के.कुंभार, प्रशालेतील मराठी विषयांचे शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.


तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कुल सर्वप्रथम
Total Views: 43