बातम्या
व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By Administrator - 10/3/2026 3:56:06 PM
Share This News:
व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
आजरा(हसन तकीलदार) :- येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (व्यंकटराव शिक्षण संकुल) मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन झाले.कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर आणि पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी सावित्रीबाईंच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त मनोगत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासावर आणि स्त्री शिक्षणातील त्यांच्या योगदानावर अनेक विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त केली. यामध्ये प्रामुख्याने: प्रांजल शेंडे, विराज पाटील, अनन्या कोळी, राजनंदिनी पाटील.संस्कृती पाटील, संस्कृती मटकर, स्वराली सावंत, स्वराज इलगे.तनिष्का शिपूरकर, संजना सावरतकर, काव्या मांगले, दिया खवरे,
शौर्य आजगेकर, आयुष्य देसाई, स्नेहल मिसाळ, स्वराम मेघुलकर व आरोही पाटील.
या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली.नियोजन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा मोटे व रूही गुडुळकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे नेटके आयोजन एस. एम. पाटील, ए. वाय. चौगुले व सौ. एस. पी. ढेकळे यांनी केले होते. शेवटी परिणिता जावळे यांनी सर्वांचे आभार मानले.या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
|