शैक्षणिक
व्यंकटराव हायस्कूलचे मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत उल्लेखनीय यश
By nisha patil - 4/18/2026 1:28:06 PM
Share This News:
व्यंकटराव हायस्कूलचे मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत उल्लेखनीय यश
आजरा(हसन तकीलदार ):- येथील व्यंकटराव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सहभाग घेऊन उज्वल सुयश संपादन केले. मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून मराठी भाषेच्या आणि मराठी विश्वकोशाच्या प्रचार व प्रसाराकरिता 'महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ,वाई, सातारायांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विचार करायला प्रवृत्त करणे, स्पर्धा परीक्षांना आवश्यक विचारसरणीला प्रोत्साहित करणे तसेच विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोश वाचनाकरिता प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही ज्ञानवर्धन स्पर्धा घेण्याचा उद्देश आहे.
या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.शहरी शाळांतून राज्यस्तर, जिल्हा स्तर व तालुकास्तरअशा तिन्ही स्तरावर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. शहरी राज्यस्तर तृतीय क्रमांक कु. प्रतीक रमेश येसणे जिल्हा स्तर प्रथम कु. ध्रुव राजाराम हरमळकर, कु. संस्कृती धनाजी इलगे जिल्हास्तर द्वितीय कु. रुद्र विशाल गुरव शहरी तालुकास्तर प्रथम कु. सृष्टी सुनील भिकले,कु. आस्था सचिन गुरव,कु. विभावरी विक्रम जावळे,कु.तृप्ती पांडुरंग नवार तालुकास्तर द्वितीय :-कु. अमृता बाळकृष्ण दोरूगडे,कु. अन्मया रणजीत देसाई,कु. आर्या अशोक कांबळे, कु. आयुष ओमकार गिरी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांना राज्यस्तर तृतीय क्रमांकाला रोख रक्कम १०,०००रु. व प्रमाणपत्र , जिल्हास्तर प्रथम क्रमांक रोख रक्कम ३०००रु. व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक २०००रु.व प्रमाणपत्र तालुकास्तर प्रथम क्रमांक रोख रक्कम १०००रु. व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक ७५०रु. व प्रमाणपत्र , तृतीय क्रमांक ५००रु. व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी शाळेतील इयत्ता नवावीचे एकूण २२विद्यार्थी बसले होते . सादर परीक्षा ही आॕनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे . यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका श्रीमती एस. के, कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ, आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर , पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शहरातून व पालक वर्गातून कौतुक होत आहे.
व्यंकटराव हायस्कूलचे मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत उल्लेखनीय यश
|