बातम्या
व्यंकटराव हायस्कूलचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश
By Administrator - 11/3/2026 10:54:27 AM
Share This News:
व्यंकटराव हायस्कूलचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश
आजरा(हसन तकीलदार) :- तालुक्यातील केदारी रेडेकर हायस्कूल, पेद्रेवाडी येथे या संस्थेचे संस्थापक कै. केदारी रेडेकर यांच्या २८व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन १०मार्च रोजी करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये 'व्यंकटराव हायस्कूल, आजराची इयत्ता नववीत शिकणारी कु. सानवी चौगुले हिने तृतीय क्रमांक पटकावला. पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व १००१रू. असे होते .कु. धनश्री महेश देसाई हिला सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले . या विद्यार्थिनींना मराठी विषय शिक्षिका श्रीमती एस. के. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
या पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनीला आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा चे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी , संस्थेचे उपाध्याक्ष, सचिव , सर्व संचालक मंडळ तसेच व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर काॕलेजचे प्राचार्य एम. एम.नागुर्डेकर सर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.
व्यंकटराव हायस्कूलचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश
|